शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जननेंद्रियाच्या क्षयरोगामुळे स्त्रियांच्या गर्भधारणेवर परिणाम : पद्मरेखा जिरगे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 00:46 IST

स्त्रियांमध्ये जननेंद्रियांच्या क्षयरोगामुळे स्त्रीबीजांची संख्या कमी होते व त्यामुळे गर्भधारणा होत नसल्याचे येथील प्रसूतितज्ज्ञ डॉ. पद्मरेखा जिरगे यांनी केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देसंशोधनास जागतिक मान्यता; कोल्हापूरचे नाव जगाच्या वैद्यकीय पटलावर पुन्हा झळकले

कोल्हापूर : स्त्रियांमध्ये जननेंद्रियांच्या क्षयरोगामुळे स्त्रीबीजांची संख्या कमी होते व त्यामुळे गर्भधारणा होत नसल्याचे येथील प्रसूतितज्ज्ञ डॉ. पद्मरेखा जिरगे यांनी केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यांचे हे संशोधन इंग्लंडमधून प्रकाशित होणाऱ्या ‘ह्युमन रिप्रॉडक्शन’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले असून, त्यामुळे या संशोधनास आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली असल्याची माहिती डॉ. जिरगे यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. जगात आतापर्यंत वंध्यत्वास कारणीभूत ठरणाºया क्षयरोगाचे स्त्रीबीजांवरील विपरीत परिणाम तपासणारे संशोधन झालेले नाही. ते कोल्हापुरात झाल्याने जगाच्या वैद्यकीय पटलावर कोल्हापूरचे नाव पुन्हा झळकले आहे.

डॉ. जिरगे यांनी २० ते ३८ वयोगटातील ८१५ स्त्रियांवर गेली पाच वर्षे हे संशोधन केले असून, त्यांपैकी ३९५ (४८ टक्के) स्त्रियांच्या जननेंद्रियास क्षयरोग असल्याचे संशोधनात स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांच्या अंडाशयामध्ये स्त्रीबीजांची संख्या कमी होत होती. त्यामुळे अंडाशयाची कार्यक्षमता व गर्भधारणेची शक्यताही कमी होते. अशा स्त्रियांवर क्षयरोगाचे योग्य उपचार झाल्यास स्त्रीबीजांची कार्यक्षमता व गर्भधारणेची क्षमता वाढते. क्षयरोगाच्या योग्य उपचारानंतर त्यातील २५ टक्के स्त्रियांमध्ये सर्वसामान्य उपचारांमध्ये गर्भधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. जिरगे यांनी हे संशोधन गर्भधारणातज्ज्ञ श्रुती चौगुले, फुप्फुसरोगतज्ज्ञ डॉ. अजय केणी व बंगलोरच्या डॉ. सुमा कुमार, शास्त्रज्ञ डॉ. दीपक मोदी व सांगलीच्या भारती विद्यापीठातील सांख्यिकी तज्ज्ञ विवेक वाक्चौरे यांच्या सहकार्याने केले. डॉ. जिरगे म्हणाल्या, आतापर्यंत क्षयरोग व वंध्यत्व यासंबंधी जगात कुठेच संशोधन झालेले नव्हते. आमच्याकडे ज्या स्त्रिया वंध्यत्वाच्या उपचारासाठी येत, त्यांचे वय ३० ते ३२ असतानाही स्त्रीबीजांचे प्रमाण त्यांच्यामध्ये का कमी आहे याचा आम्ही शोध घेण्यास सुरुवात केली. स्त्रीबीजांचे प्रमाण कमी झाले तर ते वाढविता येत नाही व ते कमी व्हायचे थांबवताही येत नाही. विविध चाचण्या करून संशोधन केले असता स्त्रियांमध्ये जननेंद्रियांमध्ये सुप्त अवस्थेत क्षयरोगाचे जंतू असल्याचे आढळले. मग स्वतंत्रपणे फुप्फुसरोगतज्ज्ञांच्या मदतीने क्षयरोगावरील सहा महिन्यांचे उपचार सुरू केल्यानंतर त्यांतील २५ टक्के स्त्रियांना पहिल्या दोन महिन्यांतच गर्भधारणा यशस्वी झाली.’ पत्रकार परिषदेला डॉ. शिशिर जिरगे, श्रुती चौगुले हे उपस्थित होते.जगाला उपयुक्त संशोधनभारतासह चीन, आफ्रिकन देश, उत्तर अमेरिका या देशांमध्ये क्षयरोगाचे प्रमाण जास्त आहे. शिवाय येथील नागरिकांना कमी वयात मधुमेह, वाढलेले वजन या समस्या आहेत. त्यांचाही वंध्यत्वावर परिणाम होतो. नव्या संशोधनाचा या देशांसह साºया जगालाच उपयोग होणार असल्याची माहिती डॉ. जिरगे यांनी दिली.गौरवास्पद संशोधन‘ह्युमन रिप्रॉडक्शन’ या नियतकालिकामध्ये एखादा शोधनिबंध प्रसिद्ध होणे याला जगाच्या पाठीवर फारच वेगळे महत्त्व आहे. भारतातील संशोधकांचे त्यामध्ये लेख प्रसिद्ध होण्याचे प्रमाण एक टक्क्याहूनही कमी आहे. अशा नियतकालिकामध्ये कोल्हापूरच्या डॉक्टरच्या संशोधनाचा विचार होणे ही बाबही गौरवास्पद आहे. या संशोधनासाठी डॉ. जिरगे यांना बंगलोरच्या राष्ट्रीय क्षयरोग निदान संस्थे (एनआयटीबीसी)चीही मदत झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMedicalवैद्यकीय